`चिकन सूप फॉर द सोल : इंडियन वुमेन` हे पुस्तक स्त्रीजातीला भेडसावणारे सार्वत्रिक प्रश्न आणि पडणारे पेच या सूत्राभोवती फिरत असले तरी, या पुस्तकाची चौकट आणि संदर्भ मात्र अस्सल भारतीय आहेत. या पुस्तकातील संवादी स्वर कन्या, बहिणी, पत्नी, माता, विद्यार्थिनी आणि कर्तृत्ववान स्त्रिया यांचे आहेत. ज्यांना भोवतालच्या कोलाहलात कधी प्रयत्नांनी, तर कधी योगायोगानं आपल्या जीवनसत्याचा साक्षात्कार झाला, अंधारात आशेचा किरण दिसला, प्रतिकूल परिस्थितीत धैर्य आणि प्रेम गवसलं. वेगवेगळ्या भूमिका निभावणाया आणि आपापल्या संसारात व कामाच्या ठिकाणी एकाच जन्मात अनेक आयुष्ये जगणाया विविध स्त्रियांच्या पाककौशल्यातून तयार झालेले हे ‘चिकन सूप’ तुम्हाला नक्कीच उल्हसित आणि प्रेरित करेल!