प्रियकर-प्रेयसी विंÂवा नवरा-बायको यांच्यातल्या प्रेमाला प्रणयाचा भरजरी पदर असतो. शारीर आणि आत्मिक अशा दोन्ही पातळ्यांवरचं हे प्रेम असतं. अशा प्रेमाची विविध रूपं ‘चिकनसूप फॉर द सोल –ट्र लव्ह’ मध्ये अधोरेखित केली आहेत. या कथा सत्य कथनातून साकारलेल्या असल्यामुळे त्यात विविधता, प्रांजळपणा, साधेपणा आहे. प्रेमिकांची पहिली भेट हा प्रेमातील पहिला आणि इंटरेस्टिंग अध्याय ‘आमची भेट कशी झाली ?’ या विभागातील नऊ कथांमधून हा अध्याय रंगला आहे. या नऊ कथांतून प्रेमिकांच्या भेटीचे विविध किस्से वाचायला मिळतात. कधी लव्ह अॅट फस्ट साइट, तर कधी गैरसमज, कधी तिरस्कार तर कधी विनोद अशा विविध छटा या पहिल्या भेटीतून अनुभवायला मिळतात. तर ‘डेटिंगमधील धाडसे’ या विभागात नायक -नायिकांनी डेटिंगसाठी आणि डेटिंगदरम्यान केलेलं धाडस, त्यातून घडलेल्या गमतीजमती वाचताना गंमत वाटते. ‘हे घडणारच होतं’ या विभागातील कथा नायक-नायिकेच्या एकत्र येण्यातील अपरिहार्यता अधोरेखित करणाNया आहेत. ‘लग्नाची मागणी’ या विभागातील कथांमध्ये नायक-नायिकेमधील अनिवार ओढ, रोमँटिक पद्धतीने, नायिकेला सरप्राइज देत नायकाने प्रपोझ करणं अशा पद्धतीच्या कथा आहेत. तर ‘विवाह’ या विभागात नायक-नायिकेची विवाह सोहळ्याविषयीची मते, स्वप्ने, नायक-नायिकांच्या पालकांचा विवाह सोहळ्यातील सहभाग, विवाह सोहळ्यावरून झालेले मतभेद इत्यादी बाबींचं चित्रण केलेलं आहे. अर्थातच या कथांमध्येही विविधता आहे.