Your cart is empty now.
डॉ. अशोक दा. रानडे यांच्या लिखाणातून नेहमीच वाचकाला संगीताबद्दलची नवी नजर मिळते. संगीतातील सृजनप्रक्रियेपासून सादरीकरणापर्यंत अनेकविध पैलूंना स्पर्श करणा-या त्यांच्या लेखमालांचे निवडक संकलन म्हणजे हा ग्रंथ. शास्त्रोक्त संगीत, विविध संगीत-परंपरा, नाट्य-संगीत, भावगीत-गायन, संगीतातील साहित्यिक अंग अशा विविध विषयांची मार्मिक मांडणी हे या ग्रंथाचे आगळे वैशिष्ट्य. जयदेव-बैजू-होनाजी अशा इतिहासातून डोकावणाऱ्या कलाकारांपासून रवींद्रनाथ टागोर, गजाननबुवा जोशी, सुब्बलक्ष्मी ते लता मंगेशकर अन् आशा भोसले अशा कित्येक कलाकारांशी डॉ.रानडे वाचकाचे अलगद बोट धरून भेट घडवतात. डॉ. रानड्यांची रसाळ, नर्मविनोदी शैली, अनेक किस्से आणि चुटके यांनी नटलेले हे संगीत विचारप्रवर्तक लिखाण वाचकाला एखाद्या कथा-कादंबरीसारखे गुंतवून ठेवील. मैफलीत पेशकश करणाऱ्या कलाकारांनी, संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि आस्वादक व अभ्यासक संगीतरसिकांनी संगीतकलेच्या व्यापकतेचे भान येण्यासाठी आवर्जून वाचायलाच हवा असा ग्रंथ.
Added to cart successfully!