पर्यावरण हा आजचा राजकीय विषय बनला आहे. पाश्चात्त्य देशांत निवडणुकांत तो महत्त्वाचा विषय मानला जातो. आपल्याकडे मात्र. थोड्या–फार चळवळी सोडल्या. तर आपण या बाबतीत उदासीनच असतो. भोपााळ दुर्घटनेनंतर प्रदूषणाबद्दल आपल्याला जाग येऊ लागली होती; पण त्या बाबतीतही पुन्हा ‘ये,रे, माझ्या मागल्या’ अशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. या दोन महत्त्वाच्या, परस्परावलंबी विषयांवरचा हा लेखसंग्रह प्रत्येकाने वाचायला हवा. या सुधारून वाढवलेल्या नव्या आवृत्तीत पर्यावरणविषयक अद्ययावत माहितीची भर नव्याने घालवण्यात आली आहे, त्यामुळे या विषयात रस असणाया सर्व वाचकांना बरीच नवीन माहिती मिळेल.