Your cart is empty now.
'अफगाणिस्तानातील परिस्थिती संवेदनशील ! तेथील स्त्री-उद्योजक विश्वाचं निरीक्षण नोंदवायचं हे तिचं काम. ‘जायचं अडलं आहे का ?’ हितचिंतकांचा प्रश्न . ‘पाठीशी आंतरराष्ट्रीय संस्था आहे, तर काय हरकत ?’ तिचं मन म्हणालं. ती निघाली. तेथे पोहोचली. पुढे ? तिला जाणवल्या,दहशतवाद्यांच्या रोखलेल्या नजरा! त्यांनी सरसावलेल्या बंदुका ! एका सुनसान रस्त्यावर घिरट्या घालणाऱ्या लाल कारमधून ती नजर तिच्या अंगावर आली. एकदा ती हॉटेलच्या स्वच्छतागृहात असताना, बंदुकींचे धाडधाड आवाज. भोवताली काचेचा खच केला! रस्त्यात रणगाडे उभे. जिकडेतिकडे सिमेंटच्या उंच भिंती. जागोजागी वाळूच्या पोत्यांच्या भिंतीआड सशस्त्र सैनिक. सतत ताण... सतत दडपण ! भय इथले तालिबानी सावट : प्रत्यक्ष अनुभव '
Added to cart successfully!