Your cart is empty now.
'ब्र उच्चारणं सोपं नसतंच कधीही. ब्र म्हणजे अवाक्षर. गप्प बस... नाहीतर... या धमकीला न भिता धाडसानं उच्चारलेला शब्द म्हणजे ब्र! स्वत:बाहेर पडणं, हा अशा भीतीवरचा उत्तम उपाय. मग एक साधारण गृहिणी ते पूर्णवेळ कार्यकर्ती अशा एकीचा सुरू झालेला प्रवास. बाईच्या नजरेनं निरागसपणानं पाहिलेलं जग. एक प्रकारे आदिवासी भागातल्या अनुभवांचा अहवाल. त्यासोबत स्वयंसेवी संस्थांमधलं राजकारण आणि स्त्री-पुरुष संबंधांमधलं राजकारणदेखील! हे लेखन महानगर, शहर, खेडेगाव आणि आदिवासी वाड्यापाडे अशा सगळयांना सामावून घेतं.
Added to cart successfully!