Your cart is empty now.
'माहेर सासर... दोन्ही ठिकाणी वयांतलं आणि कर्तृत्वांतलं धाकटेपण मनमुरादपणे उपभोगणा-या गृहिणीचं हे साधंसुधं आत्मकथन. तिचे थोरले भाऊ ‘माणूस’कार श्री.ग.माजगावकर, थोरली बहीण समाजकार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे, मेहुणे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सहवासात तिचं बालपण समृध्द झालं. कोणाही चारचौघींसारखी ती संसारात रमली होती. पण दैवाच्या अनपेक्षित आघातानं खचली. सैरभैर झाली. जीवनसाथी वासुदेव गोडे आणि बरोबरीचाच भाऊ दिलीप माजगावकर यांनी विश्र्वासपूर्ण साथ दिली. ती सावरली. पाय रोवून उभी राहिली. जेव्हा ती हे सर्व कथन करते, तेव्हा सामाजिक व्यासपीठावर दिसणा-या माजगावकर-पुरंदरे कुटुंबियांचं गृहजीवन आपोआपच सामोरं येतं आणि जोडीला ‘राजहंस’-‘माणूस’च्या वाटचालीचं ओझरतं दर्शनही होऊन जातं. कधी शाळकरी मुलीच्या कोवळ्या नजरेतून; कधी अनुभवी गृहिणीच्या चष्म्यातून! त्यामुळे हे आत्मकथन आगळंवेगळं झालं आहे.
Added to cart successfully!