Your cart is empty now.
'डॉ. आई तेंडुलकर. नावापासूनच सारे विलक्षण. बेळगावजवळील छोटयाशा गावातला बुध्दिमान तरूण, गणपत तेंडुलकर शिक्षणासाठी युरोपात जातो. तेथेच तीन विवाह करतो. डॉ. आई तेंडुलकर या नावाने जर्मन वृत्तपत्रांत भारतीय स्वातंत्र्यलढयाचे चित्रण करू लागतो. आणि अचानक दुस-या महायुद्धाचे पडघम वाजू लागतात. हा युवक भारतात परतून मराठी वृत्तपत्र सुरू करतो. स्वातंत्र्य चळवळीतील सहभागासाठी पाच वर्षांचा तुरुंगवास भोगतो. गांधीजींच्या आश्रमातील एका तडफदार तरुणीशी विवाह करतो. स्वतंत्र भारतासाठी पोलाद उद्योग सुरू करतो. त्याचे सगळे आयुष्यच विलक्षण आणि जगावेगळे. दोन देशांत घडलेली, डॉ. आई तेंडुलकर यांची, त्यांच्याच कन्येने सांगितलेली ही अदभुत कहाणी. '
Added to cart successfully!