Your cart is empty now.
'महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणा-या कोयना धरणाची ही कथा आहे. एका आधुनिक तीर्थक्षेत्राच्या उभारणीची ही कथा प्रकल्पासाठी जमीन देणा-या शेतक-याचीही आहे आणि धरण बांधून वीजिनिर्मिती करणा-या कल्पक अभियंत्याचीही आहे. एका तांत्रिक प्रकल्पाची उभारणी होत असताना कोणकोणते समरप्रसंग उभे राहतात, निसर्ग रचनेत फेरफार केले जात असताना कोणकोणती संकटं सामोरी येताता आणि जिद्दी माणसं त्या सर्व आव्हानांवर मात करून कशी पुढं जातात, याची ही अत्यंत साध्या सोप्या भाषेत करून दिलेली ओळख आहे. सामान्य वाचकांनाही सहज समजेल पण जिज्ञासूंचं कुतूहलही जागं करील, अशी ही मानव आणि निसर्ग यांच्यातील नव्या नात्याची, जिव्हाळ्याची आणि रुसव्याफुगव्याचीही एक कथा आहे.
Added to cart successfully!