Your cart is empty now.
'‘गालापगोस’ म्हणजे कासवांचे बेट. ही बेटे आहेत सुदूर प्रशांत महासागरामध्ये. तीस-चाळीस लाख वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या स्फोटांतून बनलेली ही बेटे म्हणजे या वसुंधरेवरील सर्वांत तरुण एकाकी भूमी. अपघातानेच लाखभर वर्षांपूर्वी या बेटांवर काही मोजक्या सजीवांचा चंचुप्रवेश झाला. या अतिसंवेदनशील अधिवासामध्ये काही टिकले, काही संपले. मोजक्याच वनस्पती, मूठभर पशु-पक्षी. त्यांच्या जीवनसाखळ्या अगदीच प्राथमिक, संशोधकांसाठी जणू बाळबोध लिपीच. पहिल्यांदा ती वाचली सर चार्ल्स डार्विन यांनी, तोच उत्क्रांतिवादाचा जन्म. आजही माणूस तेथे पाहुणाच आहे, आणि पाहुण्याने पाहुण्यासारखेच राहायला हवे, नाही का? त्यासाठीच हा पुस्तक-प्रपंच.'
Added to cart successfully!