Athvani Ajjichya By Arun Shevte
Athvani Ajjichya By Arun Shevte
काही नाती ही जन्मत:च मुरलेल्या स्वरूपात जुळली जातात. अगदी मुरांब्यासारखी! ही नाती ऊब, प्रेम किंवा मायेचा ओलावा अंगा-खांद्यावर घेऊनच आलेली असतात. विश्वासाचा भक्कम पाया असतो या नात्यांना!म्हणूनच कधी राग आणि गैरसमजुतीचं एखादं वादळ आलं आणि नात्यांचे धागे थोडे हेलकावले, तरी ते उसवत नाहीत किंवा तुटत नाहीत. कधी गोंजारून तर कधी फटकारुन ही नाती आयुष्य घडवणारे धडेही देत असतात. या नात्यांतून भरारी घ्यायला ऊर्जा मिळत असते आणि नंतर भरभरून कौतुकही मिळत असतं.आजोळची नाती ही अशी असतात, मग ती आईकडची असोत किंवा वडलांकडची! ‘आजोळचे दिवस’ या मालिकेत विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी याच नात्यांचे विविध पदर उलगडले आहेत.मालिकेतील हे पुस्तक आहे, आजीच्या आठवणींचं । आजीच्या तलम प्रेमाची सर कशालाच येत नाही. मऊ दुलईची ऊब देणाऱ्या पण प्रसंगी कणखरही होणाऱ्या आजीच्या बटव्यात बराच काही खजिना असतो. त्याच विषयीचे अनुभव सांगत आहेत…. मोनिका गजेंद्रगडकर, शुभदा चौकर, राधिका आपटे, शाहू पाटोळे, नितीन आरेकर, अनिल साबळे व राजीव खांडेकर।