Char Athavadyat Vajan Kami Kara! By Dr. Namita Jain, Dr. Arun Mande
Char Athavadyat Vajan Kami Kara! By Dr. Namita Jain, Dr. Arun Mande
तुम्ही आत्तापर्यंत बरेचवेळा डाएटिंग केलं असेल पण फक्त चार आठवड्यात तुमच्या शरीराला हवा तसा आकार देणं तुम्हाला जमलंय का? हे पुस्तक तुम्हाला ते निश्चितच जमवून देईल.
लेखिका डॉ.नमिता जैन या प्रसिद्ध आहार व स्वास्थ्यतज्ज्ञ आहेत. त्यांच्या वीस वर्षांच्या अनुभवातून त्यांनी तुमच्या जीवनशैलीला अनुसरून आणि कोणताही चित्र-विचित्र शॉर्टकट न वापरता प्रत्यक्षात आणता येईल असा उत्कृष्ट डाएट प्लॅन तयार केला आहे.
या डाएट प्लॅनची वैशिष्ट्यं म्हणजे-
+ वैयक्तिक गरजेनुसार आहारात बदल.
+ या प्लॅनमध्ये कोणतेही न ऎकलेले पदार्थ नाहीत.
+ तुम्हाला कोणताही बेचव आणि अनाकर्षक आहार घ्यावा लागणार नाही.
+ हे पदार्थ तुमच्या नेहमीच्या भाज्या व मसाले वापरून करता येण्यासारखे आहेत.
+ या डाएट प्लॅनमधले पदार्थ कमी तेलाचे आणि कमी उष्मांक असलेले तरीही चविष्ट आहेत.
पुस्तकाची इतर वैशिष्ट्यं आहेत-
+ घरी करता येण्यासारखे व्यायाम
+ वजन कमी करण्याविषयीची माहिती
+ दैनंदिन जीवनातील अनुभवांची उदाहरणं
मग वाट कसली बघताय? आजच हा डाएट प्लॅन सुरू करा आणि चार आठवडयात शिडशिडीत फिगर बनवा!