Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Happy Lagn.Com-2
Rs. 0.00
लग्नाला पाच-सहा वर्षं झाल्यानंतर संसारात जेव्हा तोचतोचपणा वाटू लागतो, जोडीदार नीरस आणि कंटाळवाणा होऊन जातो तेव्हा आपल्या या सर्वांत जवळच्या नात्याला खतपाण्याची गरज लागते. हे खतपाणी म्हणजे नेमकं काय, कशाप्रकारे हे नातं पुन्हा एकदा बहरू शकतं, दृढ आणि सुंदर होऊ शकतं याचं प्रभावी मार्गदर्शन या पुस्तकात आहे.
विजय नागास्वामी यांनी लग्नाच्या नात्यात उद्भवणार्‍या अनेक नाजूक आणि जटिल समस्यांची ओळख करून दिली आहे. वरवर क्षुल्लक वाटणार्‍या गोष्टी पुढे जाऊन क्लिष्ट समस्येचं रूप कसं धारण करू शकतात हे त्यांनी अनेक उदाहरणांमधून स्पष्ट केलं आहे.
नवरा व बायको यांचे भिन्न स्वभाव, वेगळया आवडी-निवडी, दोन टोकाची ध्येयं, लुडबुड करणारे त्यांचे नातेवाईक इथपासून ते लैंगिक समस्या आणि विवाहबाह्य संबंध असा एक मोठा पट या पुस्तकात त्यांनी मांडला आहे.
केवळ समाजाला घाबरून किंवा सोयीचं आहे म्हणून लग्न टिकवण्यात अर्थ नाही. तुम्हाला ज्याच्या जोडीने आयुष्याचा आनंद उपभोगायचा आहे, कौटुंबिक सुख वृध्दिंगत करायचं आहे, अशा नात्याला कायम बहरत ठेवण्यासाठी वाचा…

Click here to be notified by email when this product becomes available.

Translation missing: en.general.search.loading