निश्चित ध्येय आणि प्रयत्नांची पराकाष्टा, याच्या जोरावर अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करून उच्चशिक्षित होणं किती सहज शक्य आहे हे दर्शवणारी, अभिजित या स्लम भागातून मुसंडी मारून सीए झालेल्या तरुणाची वास्तववादी कथा. पार्श्वभूमी झोपडपट्टीची, व्यथा कौटुंबिक पार्श्वभूमीची व कथा एका ज्ञानियाची असे हे मिश्रण ‘स्लमडॉग सीए’ या पुस्तकामध्ये सामावले आहे. सीए शिवाजीराव झावरे सर झावरेज् प्रोफेशनल अॅकॅडमी कथानायकाच्या म्हणजेच अभिजितच्या यशाबरोबरच त्याला यशस्वी करणार्या जीवंत व्यक्तीरेखा लेखकाने समर्थपणे रेखाटल्या आहेत. एक प्रेरणादायी पुस्तक लिहिण्यात लेखक मनोज अंबिके यशस्वी ठरले आहेत. त्यांचे अभिनंदन. डॉ. शशिकांत वैद