माणसाचं आयुष्य ही एक अजब गुंतागुंत! नात्यांची, भावनांची आणि अतक्र्य घटनांची! काही नाती कोणतेही भावबंध निर्माण न करणारी, तर काही नकळत नात्यांचे बंध उरात जपणारी! काळाचा दीर्घ पडदा सरून गेल्यानंतरही एका अनोख्या नात्याची ओळख होते. मग... नियतीचा बळी ठरलेल्या पित्याची जबाबदारी स्वत:चं अघ्र्य देऊन पूर्ण करणाया कर्तव्यशील पुत्राचं अस्वस्थपण... आणि त्या पूर्ततेसाठी खंबीर उभी राहिलेली कन्या, यांचं अतूट नातं जपणारी पितृऋण! सुधा मूर्ती यांच्या वैचारिक, भावनाप्रधान लेखणीचा नवा आविष्कार!