Your cart is empty now.
तुम्हाला हे ठाऊक आहे?दिडशे वर्ष जगू शकणारा मानव या जगात केव्हाच जन्माला आलाय.आज आपण ज्या स्क्रिनकडे बघतो तो लवकरच आपल्या शरीरात प्रवेशणार आहेआपण नाश्त्यापूर्वी ‘हॅपीनेस पिल्स’ घेऊ तो दिवस दूर नाही.झोपायला जाण्यापुर्वी तुमच्या जोडीदाराला ‘चार्जिंग’ करायला लागू शकते.होय, आपलं भवितव्य असं काहीसं असेल आणि या प्रवासाला सुरुवात केलेला मानव या प्रवासाअखेरीस संपूर्ण वेगळा, बदललेला असेल. एक समाज आणि सजीव म्हणूनही तंत्रज्ञान आपल्यात कोणते बदल घडवू शकेल, यावर हे पुस्तक भाष्य करतं.पुढची पिढी कशी असेल? पुढच्या पिढीतील स्त्री-पुरुष वेगळे असतील का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं हवी तर कृत्रिम बुद्धीमत्ता, नॅनोटेक्नॉलॉजी, क्वांटम कंम्प्यूटिंग, जनुकशास्त्र कसं काम करतं हे समजून घ्यायला हवं.प्रेम, नैतिकता व मूल्य या मानवी वैशिष्ट्याची गणितं बदलून हे नवीन तंत्रज्ञान मानवाचं भवितव्य कोणत्या दिशेला नेईल हे जाणून घ्यायचे असेल तर चुकवू नये असे पुस्तक.
Added to cart successfully!