Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Prapat By Ranjeet Desai
Rs. 108.00Rs. 120.00
श्री. वि. स. खांडेकरांच्या या पुस्तकात पाच व्यक्तिरेखा आणि तीन रसग्रहणे यांचा समावेश करण्यात आला आहे. या पाच व्यक्तींपैकी तीन जगाला तशा अज्ञात असल्या, तरी गुणांच्या दृष्टीने त्या मुळीच उपेक्षणीय नाहीत. या व्यक्तींची तुलना रानावनांत आढळणाNया झाडपाल्यांच्या औषधांशीच करता येईल. ही औषधे तशीR सहज उपलब्ध नसतात. त्यांच्याविषयी पुरेशी माहितीही हाताशी नसते; पण योगायोगाने ज्यांना ती लाभतात, त्यांना त्यांचे गुण अचूक पटल्याशिवाय राहत नाहीत. खांडेकरांच्या मनात या व्यक्तींविषयी केवळ कृतज्ञतेचीच भावना आहे. खांडेकरांच्याच शब्दात सांगायचे, तर `...ही माणसे मला भेटली, हे आपले मोठे भाग्य, असे म्हणण्याचा मोह मला अनिवार होतो.` उरलेली ना. सी. फडके आणि ग. त्र्यं. माडखोलकर या दोघां समकालीन साहित्यकारांची मनोज्ञ व्यक्तिचित्रे आहेत. पुस्तकाच्या उरलेल्या अध्र्या भागात `कोल्हटकरांची नाटके`, `उष:प्रभा ` (श्री. मांजरेकर यांचा कथासंग्रह) आणि `मराठी चित्रकथा ` ही तीन वाङ्मयीन आणि विस्तृत अशी गुणग्राहक रसग्रहणे समाविष्ट केली आहेत. श्री. खांडेकरांचे वाचक या संग्रहाचे उत्स्फूर्त स्वागत करतील अशी खात्री आहे.
Translation missing: en.general.search.loading