Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Jawai Bapunchya Goshti By D M Mirasdar
Rs. 117.00Rs. 130.00
कला, धर्म आणि संस्कृती यांच्या नावाखाली समाजात निर्माण झालेल्या भीषण विषमतेचं दर्शन घडवणारी कादंबरी किती मोहक मूर्ती ती! एवढी सुंदर मूर्ती ठेवायची कुठं हा भक्तांना प्रश्न पडला. मूर्ती म्हणाली, ‘भक्तांचं हृदय हाच माझा स्वर्ग!` पण हृदयातली मूर्ती डोळ्यांना कशी दिसणार? सर्व भक्तांनी मूर्तीसाठी एक सुंदर देव्हारा करायचं ठरविलं. कुणी चंदनाचं लाकूड आणलं, कुणी त्यावर सुंदर नक्षीकाम केलं. स्वर्गातलं सर्व सौंदर्य त्या देव्हार्यात अवतरलं. देव्हार्यातल्या मूर्तीची रोज पूजा होऊ लागली. देव्हार्याला शोभतील अशी सुंदर फुलं रोज कोण आणतो, याबद्दल भक्तांत अहमहमिका सुरूझाली. धूप, दीप, नौवेद्य देव्हार्याला शोळतील अशी पूजेची साधनं गोळा करण्यात प्रत्येक भक्त रमून जाऊ लागला. महोत्सवाचा दिवस उगवला. देव्हारा फुलांनी झाकून गेला. धुपानं अदृष्य सुगंधी फुलं फुलविली. दीपजयोती तारकांशी स्पर्धा करूलागल्या. भक्तगण पूजा संपूवन समाधानानं मागं वळला. वळता वळता आपला पाय कशाला अडखळत आहे म्हणून प्रत्येकानं वाकून पाहिलं. देव्हार्यातली मूर्ती होती ती! ती कुणी कधी बाहेर फेकून दिली होती देव जाणे! पण एकालाही तिची ओळख पटली नाही. प्रत्येक भक्त तिला तुडवून पुढं गेला.
Translation missing: en.general.search.loading