Your cart is empty now.
सुप्रसिध्द चार्टर्ड अकौंटंट आणि प्रशिक्षक डॉ. अनिल लांबा यांनी या पुस्तकात आर्थिक व्यवहाराचे निर्णय सजगपणे घेऊन आर्थिक अडचणीत न येता व्यवसायात यशस्वी कसं व्हावं हे व्यवहारातल्या साध्या-सोप्या उदाहरणांमधून समजावून सांगितलं आहे.हे सांगताना डॉ. लांबा यांनी योग्य वित्तव्यवस्थापन कसं करावं, नफा-तोटा-पत्रक, बॅलन्स शीट कशी समजून घ्यावी, मार्जिनल कॉस्टिंग, टॉप लाइन व बॉटम लाइन, लीव्हरेज आदींसारखे किचकट वाटणारे विषयही सहजसोप्या शब्दांत रंजक पध्दतीने विशद केले आहेत.त्यामुळे स्वत:चा व्यवसाय असलेले व्यावसायिक, छोटे-मोठे व्यापारी व उद्योजक, बँक अधिकारी, विद्यार्थी तसेच या विषयात रस असलेले जिज्ञासू अशा सर्वांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरेल, हे निश्चित!
”आज ना उद्या प्रत्येकाला हे नक्की पटेल की कोणताहीव्यवसाय यशस्वी होण्यासाठी बॅलन्स शीट आणिवित्तव्यवस्थापन समजून घेणं महत्त्वाचं असतं.”-अनिल लांबा
Click here to be notified by email when this product becomes available.
Added to cart successfully!