Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

bhartache krantisavidhan भारताचे क्रांतिसंविधान by yashvant manohar यशवंत मनोहर
Rs. 0.00
भूतकाळभर फॅसिस्ट मनोवृत्तीने स्त्रिया, भटके-विमुक्त, आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि पूर्वास्पृश्य यांची पार नागवणूकच केली आहे. कधी ती धर्माची अफू चारून, तर कधी देव-दैववादाचा क्लोरोफॅार्म देऊन केलेली आहे. कधी जातींच्या आणि परंपरांच्या अभिमानाचे जहर पाजून केलेली आहे. संविधानाने या फसवणुकीची सर्व पातळयंत्रे उद्ध्वस्त केली आहेत. या देशातल्या वंचितांच्या विकासाचे,माणुसकीचे आणि समान न्यायाचे सर्व सुंदर प्रकल्प संविधानाने आपल्या अंतरंगावर कोरून ठेवलेले आहेत. हे संविधान बदलले तर या सर्व प्रकल्पांनाच आपण गमावून बसू.
       संविधान दु:खांना, दुर्बलांना उराशी कवटाळते आणि त्यांचं निर्भयतेत, समतोल आणि बंधुत्वात पुनवर्सन करते. या विशालकाय देशात आपण अनाथ नाही तर एखाद्या सत्याच्या, न्यायाच्या आणि स्वप्नांच्या पहाडासारखे संविधान आपल्या पाठीशी उभे आहे, ही येथल्या प्रत्येक माणसाची ठाम निष्ठा आहे. हा आपल्या संविधानाच्या महत्तेचा अजिंक्य पुरावा आहे. म्हणून माणुसकीच्या चाहत्यांनी संविधानाभोवती संरक्षक कवच झाले पाहिजे. ज्यांना संविधान पोटाशी घेते त्यांनी संविधानाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.

Click here to be notified by email when this product becomes available.

Categories:
Translation missing: en.general.search.loading