Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Kalantar By Arun Tikekar
Rs. 0.00
गेल्या पन्नास-साठ वर्षांत आपल्या समाजात झालेल्या पडझडीचे चित्रण करण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न.स्वातंत्र्याच्या कालखंडात महाराष्ट्राने काय गमावले, काय कमावले याचा आलेख काढणारा.त्यात कमावण्याच्या बाजूला थोडेच आणि गमावण्याच्या बाजुला भरपूर असल्याचेच आढळून आले.समाजबदल तर होत होता.तो केवळ बाह्यस्वरूपी होत आहे,का केवळ तंत्रंयानाने आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत,की समाजमन वैंज्ञानिक विचारांची कास धरून विवेकवादी होत आहे,धर्माचे अवडंबर कमी होत आहे की वाढत आहे,असे प्रश्नही मनात येऊ लागले...
प्रश्नांची उत्तरे शोधू गेल्यास ध्यानात येते की,ज्या प्रकारची पडझड झाली आहे ती स्वागतार्ह बदलापेक्षा किती तरी अधिक आहे...
या कालखंडात आपण काय मिळवले आणि काय गमावले याची चर्चा तर सुरूवातीला केली पाहिजे.शिक्षणापासून ते वेगवेगळ्या व्यवसायापर्यंत,समाजकारणापासून ते राजकारणापर्यंत,व्यक्तिगत जीवनापासून ते सार्वजनिक जीवनापर्यंत विविध क्षेत्रांतील पडझडीची चर्चा करणे एवढाच या लेखसंग्रहाचा मर्यादित हेतू!

Click here to be notified by email when this product becomes available.

Translation missing: en.general.search.loading