Your cart is empty now.
महाराष्ट्राच्या काना-कोपर्यात श्री. माधव गडकरी यांची भाषणे गाजत आहेत. शिक्षण-संस्था, खासगी-संस्था, राजकीय संघटना आणि इतर संघटनांकडून माधव गडकरी यांना भाषणासाठी सतत बोलावण्यात येते. वयाच्या २१ व्या वर्षापासून श्री. गडकरी हे भाषण करीत आले आहेत. त्यामुळे भाषण-शास्त्राचा त्यांचा दीर्घानुभव आहे. या दीर्घानुभवाच्या साहाय्याने ‘सभेत कसे बोलावे?’हे पुस्तक सर्वांना उपयोगी पडेल असे म्हटल्यास वावगे होणार नाही. विविध प्रसंगी कसे बोलावे हे अनेक नामवंतांची भाषणे या पुस्तकात देऊन त्यांनी पटविले आहे. भाषण करताना येणार्या अडचणी, त्यातील दोष यांचे त्यांनी उत्तम तऱ्हेने विवेचन केलेले आहे. थोडक्यात म्हणजे शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना, त्याचप्रमाणे वेगवेगळया वर्तुळात कार्य करणार्या व्यक्तींना व सभेत समाजसेवकांना समयोचित कसे बोलावे हे श्री. माधव गडकरी यांनी आपल्या प्रतिभाशाली लेखणीतून या पुस्तकात सांगितले आहे. त्यादृष्टीने हे पुस्तक भाषणे करणार्यांना, ठरविणाऱ्यांना व करू इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शक ठरेल याची खात्री वाटते.
Click here to be notified by email when this product becomes available.
Added to cart successfully!