Your cart is empty now.
स्टोरी’ टेलर’ हे पुस्तक म्हणजे एका मनस्वी दिग्दर्शकाचा सर्जनशील प्रवास होय. दिग्दर्शक म्हणून वीस वर्षांच्या कारकिर्दीत गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शित केलेल्या साठ चित्रपटांपैकी१२ निवडक चित्रपटांच्या निर्मितीमागच्या कथा हे पुस्तक सांगतं.कथालेखन, निर्मात्याचा शोध, कलाकार निवड, प्रत्यक्ष चित्रीकरण, संकलन, प्रसिद्धी अशा अनेक आघाड्यांवर चित्रपट दिग्दर्शकासमोर असलेली आव्हानं या पुस्तकातून आपल्याला समजतात.प्रत्येक चित्रपटाच्या निर्मितीशी अनेक रंजक किस्से आणि बरे-वाईट अनुभव यांचं नातं जुळलेलं असतं… ते किस्से, ते अनुभव सांगता सांगता गजेंद्र दिग्दर्शक म्हणून या सगळ्या सिनेमांच्या ‘मेकिंग ‘कडे पुन्हा एकदा बघतात आणि स्वतःला तपासतात. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील आघाडीचे कलाकारही पुस्तकात या स्टोरी’ टेलर ‘विषयी मनमोकळेपणे बोलतात.एकंदर सांगायचं तर, सिनेरसिक आणि अभ्यासक यांच्या हाती या पुस्तकाच्या निमित्ताने मोठा ऐवज पडणार आहे. तो ऐवज चित्रपटरसिकांना रंजक तर वाटेलच; पण त्याचबरोबर चित्रपटनिर्मिती क्षेत्रात येऊ इच्छिणारे आणि चित्रपटनिर्मितीच्या वेगवेगळ्या विभागांत प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, तसेच या क्षेत्रातले नवोदित अशा सगळ्यांसाठी स्टोरी’ टेलर’ जणू संग्राह्य असं ‘गाइड’ही ठरणार आहे.
Click here to be notified by email when this product becomes available.
Added to cart successfully!