Skip to product information
1 of 1

संगत, नरहरची मधु कुरुंदकर Sangat Naraharachi

संगत, नरहरची मधु कुरुंदकर Sangat Naraharachi

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

१९३२ ते १९८२ असे केवळ ५० वर्षांचे आयुष्य लाभलेल्या नरहर कुरुंदकर यांना विचारी महाराष्ट्र लेखक व वक्ता म्हणून ओळखतो. मराठवाड्याची शान आणि विवेकाचा प्रवक्ता, अशी त्यांची ख्याती होती. राजकारण, समाजकारण, साहित्य, संस्कृती इत्यादी क्षेत्रांतील अनेकविध विषयांची चर्चा-चिकित्सा त्यांनी केली. हजारो भाषणे आणि शेकडो लेख यांद्वारे त्यांनी विवेकजागर चालवला. (अर्थातच, हे करताना त्यांनी भावनांचे महत्त्व ओळखून जीवनातील माधुर्य सातत्याने जपले.) त्यांनी केलेले हे कार्य वयाच्या पंचविशीनंतरचे आहे. म्हणजे हे विचारकार्य घडवणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची घडण आधीच्या पंचवीस वर्षांत झाली, ती प्रक्रिया नेमकी काय होती, याचे कुतूहल त्यांचे लेखन वाचलेल्या सर्व लहानथोरांना असते. ते कुतूहल बऱ्याचअंशी शमवणारे आणि अनेक पटीने वाढवणारे हे पुस्तक आहे. वय वर्षे १० ते २२ या काळातील नरहरी कसा आकाराला येत गेला, याचे चित्रमय व आशयसंपन्न वर्णन त्याच्या निकट सहवासात राहिलेल्या गाववाल्या समवयस्क मित्राने केले आहे. अतिशय समरसून, उत्कटतेने व भारावलेल्या मनाने केलेले हे लेखन आहे. अशा प्रकारचे पुस्तक मराठीत तरी अन्य कोणते नसावे...

View full details