Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Aanandayogi Pu. La | आनंदयोगी पु.लं by AUTHOR :- Na.Dho.Mahanor
Rs. 90.00Rs. 100.00
…महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व हे विशेषण पु. लं. साठीच निर्माण झाले आणि वापरून वापरून ते कितीही गुळगुळीत झाले असले तरी आता पुन्हा दुसऱ्या कुणा मराठी माणसासाठी वापरता येईल, अशी शक्यता दिसत नाही…

 

पु. लं. नी विरोधकांवरही प्रेम केले. ‘पुलकित’ मराठी माणूस त्यांच्या जाण्याने मनापासून दुःखी झाला. आठवणींना सर्जनाच्या पातळीवर नेणे हे सोपे काम नाही. आठवणी मुळातच स्थूल स्वरूपाच्या असतात…या आठवणींत महानोर आत्मनिवेदन करतात, स्वत:लाही प्रक्षेपित करतात.

भावनाविवशही होतात, पण कल्पनेचा आश्रय जवळपास घेत नाहीत.
कल्पना म्हणजे खोटे नव्हे. जे घडले त्याला सर्जनशील बनवणारे तत्त्व कल्पना हेच असते. त्यामुळे आठवणी रमणीय होतात.
हे व्हायला काही काळही जावा लागतो. महानोरांनी ताजेपणीच या आठवणी लिहिल्या आहेत…
महानोरांचे हे लेखन म्हणजे पु. लं. वर लिहिलेला मृत्यूलेख नाही. पु. लं. च्या अष्टपैलू म्हणजे आठहून अधिक गुणविशेषांचा परिचय वा आढावा अनेकांनी घेतला आहे.
महानोर ते पुन्हा सांगत नाहीत.
पण त्या त्या क्षेत्रातले त्यांच्या वाट्याला आलेले अनुभव मात्र ते अवश्य सांगतात, कारण ते त्यांचे स्वत:चे असतात.
आपल्या संदर्भातच ते पु. लं. च्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू दाखवतात. मग ते इतरांनी दाखवलेले असले तरी वेगळी नजर घेऊन येतात.
महानोरांच्या नजरेतून त्याचे अनोखे दर्शन घडते… महानोरांचे लेखन चिकित्सक नसेल; पण पारदर्शी आहे, विश्लेषक नसेल, पण आत्मीय आहे; चिंतनशील नसेल; पण सत्यशील आहे.
चांगल्या माणसांच्या शोधात निघालेल्या माणसाचे हे लेखन आहे…”
– निशिकांत ठकार


Translation missing: en.general.search.loading