Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Havyas By Suhas Shirvalkar
Rs. 473.00Rs. 525.00

वाचेतील जन्मजात दोष, त्यामुळे भाषांविषयी भीती, गणितातली आकडेमोड आणि इतिहासातल्या सनावळ्या डोक्यात न शिरणाऱ्या अशा परिस्थितीतल्या एका सर्वसामान्य भासणाऱ्या मुलाच्या जमेच्या बाजू होत्या, वारसा हक्काने मिळालेला स्वभावातला कनवाळूपणा, कष्ट करण्याची जिद्द आणि दोन हात वेगवेगळ्या खेळांत आणि कलांमध्ये अतिशय कुशलतेने चालणारे! या गुणांच्या जोरावरच स्वतः मधल्या कमतरतांवर मात करून या सर्वसामान्य मुलाने घेतलेल्या गरुडभरारीची ही कथा.

इंग्लंडमधल्या दोन्ही एफ. आर. सी. एस. परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पार करून एक उत्तम सर्जन म्हणून लौकिक मिळवणारा हा मुलगा म्हणजेच स्वादुपिंड आणि पित्ताशय या पोटातील कठीण समजल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवणारे, या स्पेशलायझेशनच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या भारतातील शाखेच्या अध्यक्षपदाचा मान मिळवणारे पहिले भारतीय सर्जन आणि आपल्या विचारप्रवर्तक भाषणांमुळे उत्तम वक्ता म्हणून नावाजले गेलेले डॉ. वि. ना. श्रीखंडे.

आपल्या या यशाच्या प्रेरणा, आपले वैद्यकक्षेत्रातले अनुभव आणि एक जबाबदार नागरिक म्हणून समाजाविषयी त्यांनी केलेला विचार यांचा उपयोग समाजाला करून द्यावा या हेतूने डॉक्टरांनी हे लेखन केले आहे. डॉक्टर होण्यासाठी आवश्यक असणारी मानसिक जडणघडण कोणत्याही विद्यापीठात करून घेतली जात नाही. डॉक्टर श्रीखंडे यांनी आपल्या कारकिर्दीत आपल्या विद्यार्थ्यांवर हे संस्कार जाणीवपूर्वक केले. हे त्यांचे कार्य आपल्या समाजाला मिळालेली मोठी देणगी आहे. पैशाचा हव्यास न धरता आणि माणुसकीची कास न सोडतादेखील समृद्ध आणि समाधानी आयुष्य जगता येते याचा आदर्श डॉक्टरांनी स्वत: च्या उदाहरणाने निर्माण केला.

आजवर वैद्यकीय क्षेत्रापुरतेच मर्यादित असलेले डॉक्टरांचे विचार या पुस्तकाच्या रूपाने सर्वांपर्यंत पोहोचत आहेत. स्वत: ची बलस्थाने ओळखून जिद्द, संयमी वृत्ती, परिश्रम, नीतिमत्तेची कास यांच्या आधारावर सामान्य समजला जाणाराही असामान्य कार्य करू शकतो याचा आदर्श ह्या आत्मनिवेदनात सापडेल.

Translation missing: en.general.search.loading