Skip to product information
1 of 1

Adarsha Nibandhancha Sangraha | आदर्श निबंधांचा संग्रह by AUTHOR :- Aruna Kalaskar

Adarsha Nibandhancha Sangraha | आदर्श निबंधांचा संग्रह by AUTHOR :- Aruna Kalaskar

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

निबंध म्हणजे योग्य विचारांची अर्थपूर्ण रचना होय. विषयाच्या अनुषंगाने मनात येणारे विचार सुसंगतपणे आणि आकर्षक शैलीत मांडणे, हे एक कौशल्य आहे. ते निश्चितच प्रयत्नाने साध्य होते.
निबंधलेखनाकरिता त्या विषयाचे सखोल ज्ञान असावे लागते. हे ज्ञान अवलोकनाने, वाचनाने आणि आपापसांत चर्चा करून मिळू शकते. सुभाषिते, सुविचार, काव्यपंक्ती, लोककथा किंवा दंतकथा, वाक्प्रचार, म्हणी यांद्वारे शब्दसाज ल्यालेला निबंध उत्कृष्ट ठरतो.
प्रस्तुत पुस्तकात विविध प्रकारच्या निबंधांसोबतच बातमी, सारांश, अभिप्राय, पत्र, कथा, वृत्त व जाहिरात यांसारखे उपयोजित लेखन कसे करावे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले आहे. इयत्ता नववी, दहावीच्या नव्या कृतिपत्रिकेनुसार प्रभावी मार्गदर्शन या पुस्तकात आहे.
विद्यार्थ्यांचे लेखनकौशल्य खुलविण्यासाठी आत्मकथनपर निबंधापासून ते ललित निबंधापर्यंत सर्व प्रकार हाताळतानाच असे निबंधलेखन कसे करावे, याविषयी अनमोल सूचनांचा या पुस्तकात अंतर्भाव करण्यात आला आहे.
प्रत्येक पालक, शिक्षक व विद्यार्थ्याच्या संग्रही असायलाच हवा असा हा ‘आदर्श निबंधांचासंग्रह!’

View full details