शाळा, कॉलेजपासून स्पर्धापरीक्षेपर्यंत सर्वांसाठी परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचा अचूक मंत्र डॉ. विजय अग्रवाल हे माजी राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांचे खासगी सचिव होते. सिव्हिल सर्व्हिसमध्ये ते 1983 साली दाखल झाले. पुढे डॉ. अग्रवाल यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि सध्या ते अभ्यास, लेखन तसेच आयएएसची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचा वेळ देत आहेत. त्यांची योग्य निर्णय कसे घ्यावे, मन जिंका जग जिंका, तुम्ही खअड कसे व्हाल ही पुस्तके अत्यंत लोकप्रिय आहेत.ते स्वतः अनेक विश्वविद्यालये तसेच राष्ट्रीय स्तरावरील संस्थांसाठी सन्माननीय मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना यशस्वी आणि आनंदी करिअर करण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक खूपच उपयोगी आहे. या पुस्तकात जी टेक्निक्स सांगितली आहेत ती वापरल्यास जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नक्कीच यश मिळेल. - अरूप रॉय चौधरी, (पी.एच.डी. मॅथेमॅटिक्स, स्टेट युनिव्हर्सिटी ऑङ्ग न्यू जर्सी, अमेरिका) हे पुस्तक विचारांना आकार देतं, दृष्टिकोन अधिक स्पष्ट करतं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची जागरूकता वाढवून कोणत्याही प्रकारच्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवून देऊन विद्यार्थ्यांमध्ये आश्चर्यकारक बदल घडवून आणतं. - हर्ष अग्रवाल, (97.8% कॉमर्स, सी.बी.एस.ई. लंडन स्कूल ऑङ्ग इकॉनॉमिक्स) ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी अद्भुत असं हे पुस्तक आहे. - अनिकेत पाटनी, (आय.आय.टी. कानपूर)