Skip to product information
1 of 1

Ase Hote Aaple Shahu Maharaj by Dr. Nandkumar More असे होते आपले शाहू महाराज नंदकुमार मोरे

Ase Hote Aaple Shahu Maharaj by Dr. Nandkumar More असे होते आपले शाहू महाराज नंदकुमार मोरे

Regular price Rs. 115.00
Regular price Sale price Rs. 115.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

‘असे होते आपले शाहू महाराज' हे राजर्षी शाहू महाराजांचे नावीन्यपूर्ण चरित्र वाचताना तुम्हाला महाराजांच्या काळात फेरफटका मारत आहोत, असे वाटेल.

डॉ. नंदकुमार मोरे यांनी अतिशय परिश्रमाने आणि कल्पकतेने शाहू महाराजांचा चरित्रपट सुबोध भाषेत साकारला आहे. महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग, त्यांचे विचार आणित्यांनी केलेली मोठमोठी कामे तुमच्यासमोर गोष्टीरूपात मांडली आहेत.

शाहू महाराजांनी सामान्य माणसांना, गोरगरिबांना, स्त्रियांसह, शेतकरी आणि दलित- बहुजनांना न्याय मिळावा; त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी खूप मोठे काम उभारले आहे. या कामाचे स्वरूप एका अभिनव पद्धतीने गोष्टीरूपात येथे वाचायला मिळेल. शिक्षण हा समाज उभारणीचा पाया आहे, हे ओळखून महाराजांनी सर्व समाजाला अतिशय तळमळीने शिक्षण दिले. 'शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही', हे त्यांचे ब्रीदवाक्यच होते. त्यामुळे या क्षेत्रात त्यांनी फार मोठे काम उभारले. ते संपूर्ण काम या चरित्रामध्ये जाणीवपूर्वक समोर आणले गेले आहे.

राजर्षी शाहू महाराज स्वतःला 'शेतकरी' म्हणवून घेण्यात धन्यता मानत. त्यांचे नाते शेती आणि शेतकऱ्यांशी होते. त्यांचा सर्वांमध्ये मिळूनमिसळून राहण्याचा, त्यांच्यासाठी कौशल्याने आणि कल्पकतेने नवी कामे उभारण्याचा स्वभाव या चरित्रात साकारला गेला आहे. या चरित्रातून महाराजांची जी प्रतिमा समोर उभी राहते, तीच मुळी 'लोकराजा' अशी आहे. त्यांची हीच प्रतिमा त्यांच्या कर्तृत्वाची ओळख होती. त्यामुळे ती यथामूल साकारण्यासाठी डॉ. नंदकुमार मोरे यांनी केलेले प्रयत्न अतिशय महत्त्वाचे ठरले आहेत.

त्यामुळेच हे चरित्र म्हणजे केवळ एका राजाची गोष्ट नव्हे, तर एका समाजसुधारकाची, द्रष्ट्या नेत्याची आणि एका 'लोककल्याणकारी राजा'ची गाथा ठरते.

हे चरित्र तुमच्या मनातील राजर्षी शाहू महाराजांबद्दलचा आदर अजून वाढवेल. त्यांच्यासारखे काहीतरी चांगले, समाजहीताचे काम करण्याची प्रेरणा देईल. शिवाय जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टीही देईल, याची खात्री आहे.

View full details