Asha Ek Surel Zanzawat ( आशा एक सुरेल झंझावात ) By Dwarkanath Sanzgiri , Rajesh Ajgaonkar
Asha Ek Surel Zanzawat ( आशा एक सुरेल झंझावात ) By Dwarkanath Sanzgiri , Rajesh Ajgaonkar
Asha Ek Surel Zanzawat ( आशा एक सुरेल झंझावात ) By Dwarkanath Sanzgiri , Rajesh Ajgaonkar
आजाराशी लढत असताना, मन दुसरीकडे गुंतवण फार महत्वाचं असतं.
म्हणून मी ठरवलं पुस्तकं लिहावीत. लेखाचं आयुष्य तसं कमीच. फार तर काही दिवसाचं. एखादा लेख लोकप्रिय झाला तर तो अलीकडे वारंवार व्हॉट्स अप वर फिरतो. पण पुस्तकाचं आयुष्य तसं दीर्घ असतं. चांगल असेल तर ते पुढच्या पिढीतही जातं. हल्ली नव्या तांत्रिक युगात कुठलंही भाकीत तसं चुकू शकतं म्हणा. पण नव्याने एखाद मोठं पुस्तक हल्ली करणं मला कठीण पडत. औषधांनी माझी ऊर्जा कमी केलीय. पण मित्र आणि विशेषतः लेखक मित्रांचा माझ्याकडे तुटवडा नाही. राजेश आजगावकर पुढे आला आणि त्याने लिखाणाचा अर्धा भार उचलला. मीना कर्णिक आली आणि तिने पुस्तकाचं संपादन केलं. नूतन असगावकर आली आणि तिने पुस्तकाला सौंदर्य बहाल केलं. सुरेश एजन्सीचे कारले ह्यांनी ते प्रकाशित करायची जबाबदारी
घेतली आणि त्यातून आशा भोसले वरच पुस्तक आकाराला आलं. आता पुढची जबाबदारी तुमची, म्हणजे विकत घेऊन वाचण्याची. आणि ते तुम्हाला आवडलं तर माझ्या कष्टाचं चीज होईल.