Skip to product information
1 of 1

Aurangzeb by Gajanan Bhaskar Mehendale औरंगजेब आणि उत्तर कालीन मुघल

Aurangzeb by Gajanan Bhaskar Mehendale औरंगजेब आणि उत्तर कालीन मुघल

Regular price Rs. 560.00
Regular price Rs. 600.00 Sale price Rs. 560.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author

Aurangajeb by Gajanan Bhaskar Mehendale

भारतातील इस्लामी राजवटींचे धार्मिक धोरण : औरंगजेब आणि उत्तर कालीन मुघल

काफिरांवरील लादलेला जिझ्या कर हा औरंगजेबाच्या दृष्टीने केवळ आर्थिक विषय नव्हता, त्याच्या दृष्टीने तो प्राधान्याने धार्मिक विषय होता, हे या खालील प्रसंगावरून स्पष्ट होते. 

हमीदुद्दीनखान याने संकलित केलेल्या अहकाम-इ आलमगीरीत सांगितला आहे, तो असा "इस्लामपुरी येथे असलेल्या तळाचे रक्षण आणि ब-हाणपूर पासून हुजुरांपर्यंतच्या रस्त्याचे रक्षण या कामांवर खान फीरूझजंग याला नेमले होते. त्याचा अर्ज आला की 'माझ्या आईचा मकबरा भीमा नदीच्या तीरावर आहे. तेथील बाजारामुळे बादशाही छावणीत भरपूर रसद येते, म्हणून त्याची भरभराट होणे (आबादी) जरूर आहे. तेथील रहिवासी असलेल्या हिंदूंना जिझ्याची माफी दिल्याशिवाय हे पार पडणार नाही. इनायतुल्लाखानाने जिझ्याची माफीची सनद पाठवावी असा हुकूम व्हावा.

यावर बादशाहांचे दस्तखत झाले म्हणजे औरंगजेबाने स्वतः शेरा लिहिला की 'आम्ही मार्गभ्रष्टांपासून म्हणजे मुसलमानेतरांकडून मदत घेत नाही. मकबऱ्याच्या बाजाराची भरभराट इच्छिणे आणि 'काफिर स्वतःच्या हाताने जिझ्या देईपर्यंत आणि नम्र होईपर्यंत त्यांच्याशी युध्द करा' या पवित्र कुराणातील जिझ्या विषयीच्या हुकुमात 'माफीलायक होईपर्यंत' असे पदरचे शब्द घालणे शहाणपणापासून व आदरणीय शराच्या म्हणजे इस्लामी कायद्याच्या पालनापासून हजार कोस दूर आहे हे आमची प्रवृत्ती जाणणाऱ्या त्या निष्ठावान सेवकास म्हणजे खान फीरूझजंग यास ठाऊक आहे. उघड आहे की अत्यंत हीन व लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारा असा सोबत्यांचा एक गटतुमच्या मार्गभ्रष्टतेस कारणीभूत आहे आणि त्याने तुमच्या मनात कुजक्या मांसाच्या लालसेला जागा दिली आहे. पण हा अनुभवी वृध्द म्हणजे स्वतः औरंगजेब या आकर्षणात कसा फसेल? यावर शेवटी औरंगजेबाने केलेले मार्मिक काव्य, जे असे कि, 'जा, हा सापळा दुसऱ्या एखाद्या पक्षास लाव कारण अनकाचे घरटे खूप उंचावर आहे.' अनका हा फक्त नावाने ज्ञात असणारा पण प्रत्यक्षात कधीही न मिळणारा काल्पनिक पक्षी आहे, म्हणूनच मिळण्यास कठीण किंवा अशक्य गोष्ट असाही एक अर्थ त्या शब्दाला प्राप्त झाला आहे. जिझ्या माफीसारख्या सवलती दिल्या तर व्यापारी बाजारात दुकाने थाटतील आणि त्यामुळे लष्कराला भरपूर रसद मिळत राहील हे खान फिरूझजंग याचे म्हणणे लष्करी दृष्ट्या अगदी वाजवी होते. पण औरंगजेबाला धर्मापुढे आर्थिक बाबींची जशी पर्वा राहिली नव्हती तशीच लष्करी बाबींचीही राहिली नव्हती. त्याच्या दृष्टीने धर्माचरण, म्हणजेच कुराणाचे पालन, महत्त्वाचे होते आणि धिम्मींकडून (काफिर हिंदूंकडून.... ) ते जिझ्या देत नाहीत तोपर्यंत युध्द करा असा कुराणाचा हुकूम आहे. जिझ्या लावण्याकरता तो हुकूम त्याला शिरोवंध होता आणि पुरेसा होता.

लेखक : गजानन भास्कर मेहेंदळे

 

View full details