Your cart is empty now.
कोणत्याही देशाचा इतिहास हा वेगवेगळ्या अंगांनी अभ्यासणे गरजेचे असते. या विविध अंगांमध्ये समकालीन कागदपत्रे, विविध पत्रव्यवहार आणि प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णने, त्यांचा रोजनिशी मधील नोंदी इतिहास अभ्यासात मोठी लक्षणीय भर घालताना दिसून येतात. एखाद्या देशाचा किंवा कालावधीचा इतिहास समजून घेताना परदेशी प्रवाशांनी केलेली तत्कालीन वर्णने ही त्या देशाचे किंवा त्या समाजाचे एक सजीव चित्रच इतिहास अभ्यासकांसमोर उभे करते. या शब्द चित्रातून इतिहास अभ्यासकांना त्या देशाचा त्यात समाजाचा अभ्यास करण्यास मोठी मदत होते. सोन्याचा धूर येणारी भूमी म्हणून आपला भारत देश हा परदेशी प्रवाशांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरला आहे. या सुवर्णभूमीला चौथ्या शतकापासून भेट देणाऱ्या काही प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध प्रवाशांची प्रवासवर्णने या पुस्तकातून देताना आम्हाला आनंद होत आहे. राफ्टर पब्लिकेशन्सचे हे शब्द पुष्प भारतातील आणि महाराष्ट्रातील इतिहास प्रेमी सारस्वतांच्या पसंतीस उतरेल याची खात्री आहे.
Added to cart successfully!