Skip to product information
1 of 1

Bhumika Ani Utsav By Asha Bage भूमिका आणि उत्सव

Bhumika Ani Utsav By Asha Bage भूमिका आणि उत्सव

Regular price Rs. 144.00
Regular price Rs. 160.00 Sale price Rs. 144.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

'भूमिका' आणि 'उत्सव' ह्या दोन लघु कादंबऱ्यांचे पुस्तक .

आई गेल्यानंतर बापापासून दूर आपल्या आजी-आजोबांकडं, बालपणापासून थोरला होईपर्यंत वाढत जाणाऱ्या नातवाची (सोहन) शांतपणे कुणावर तरी विसंबून राहून, म्हातारपण निभावून न्यायचं होतं मला, असं म्हणणाऱ्या आजी आणि सेवानिवृत्त प्राध्यापक आजोबा (दादासाहेब) ह्या प्रमुख व्यक्तिरेखांना जगताना सुखदु:खांचे ताणतणाव कसे येतात-जातात, जगता-जगता त्या कशा दमून जातात, तरीही आपापल्या समजुतीने जगण्याचे प्रयोजन शोधीत राहातात. पण सर्वांच्या वाट्याला पाहिजे ते येतेच असे नाही! हे मानवी जीवनाचे उघडे दर्शन देऊन 'भूमिका' कादंबरी संपते.

दुसरी कादंबरी 'उत्सव' म्हणजे डॉ. सरस्वती (सरू) आणि माधवी (मधु) ह्या जिवलग मैत्रिणींची जीवनकथा. ह्यात दोघींच्या वाट्याला आलेले एकटेपण स्वीकारून, आयुष्य समंजसपणे जगत, अखेरीला एकुलत्या एक जन्माचे सोने कसे करता येते; हे सांगत ही कादंबरी योग्य जागी संपते!

ह्या दोन्ही कादंबऱ्यांची रचना; सहज-सुरेख स्वाभाविक असून, कमी व्यक्तिरेखांमध्ये प्रवाहित होते आणि जे सांगायचे असते ते कमालीच्या सहजतेने सांगत; अनेक महत्त्वाच्या समस्यांची उत्तरे देत जागे करीत राहाते.

View full details