Dhundi Kalyana By Martand Aughade धुंदी कळ्यांना
Dhundi Kalyana By Martand Aughade धुंदी कळ्यांना
Couldn't load pickup availability
प्रा. मार्तंड औघडे यांनी 'धुंदी कळ्यांना' या जुन्या मराठी चित्रपटातील आशयघन गाण्यांचे व 'चांदणे शिंपीत जाशी' या भावगीतांवर आधारित पुस्तकातून अवीट गोडीच्या भावगीतां-चे जे परीक्षण केले आहे, खरे तर ते रसग्रहण म्हणावयास हवे ते अभ्यासपूर्ण असेच आहे. यासाठी त्यांनी ज्या अभिजात गाण्यांची निवड केली आहे ती गाणी आज पुन्हा एकदा त्यांनी या वेगळ्या उपक्रमातून नव्या पिढीसमोर ठेवली आहेत त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! त्यांनी हे रसग्रहण करताना प्रत्येक गाण्यामागची पार्श्वभूमी आणि त्या गाण्याचा प्रसंग अतिशय साध्या सोप्या शब्दात उलगडून दाखविला आहे. तसेच त्यातील कवीच्या मनातील भाव आणि त्यास अनुरूप दिलेल्या संगीतावरही त्यांनी उत्तम भाष्य केले आहे. ही दोन्ही पुस्तके प्रत्येक मराठी संगीत रसिकांनी आपल्या संग्रही ठेवावीत अशीच आहेत. आपल्या या वेगळ्या संगीतमय प्रयोगाला माझ्या मनस्वी शुभेच्छा !!
Share
