Skip to product information
1 of 1

Durgajidnyasa by Pradip Sanjay Patil दुर्गजिज्ञासा

Durgajidnyasa by Pradip Sanjay Patil दुर्गजिज्ञासा

Regular price Rs. 775.00
Regular price Rs. 850.00 Sale price Rs. 775.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

‘दुर्गजिज्ञासा’ मांडताना मला तब्बल नऊ वर्षांचा कालावधी लागला. हा ग्रंथ ऐकिव भाकडकथांवर आधारलेला नसावा, त्यातल्या प्रत्येक वाक्याला संदर्भाची उत्तम जोड दिलेली असावी, सातारा जिल्ह्याच्या दुर्गमाळेत हा ग्रंथदुर्ग त्याच तेजाने उठून दिसावा म्हणून माझा अटोकाट प्रयत्न होता. सह्याद्रीच्या मस्तकावर उभे असलेले अनेक गडकिल्ले ऊन, वारा, पाऊस यांच्याशी निकराचा लढा देत आजमितीस तग धरून आहेत. ऐतिहासिक सातारा जिल्ह्यातील दुर्गसंपदा ही अशीच इतिहासाला कुशीत घेऊन बसलेली. वादळ-वाऱ्याला तोंड देत पडत झडत का होईना; पण आजही या गडकोटांचे तट-बुरुज खंबीरपणे उभे आहेत. हे गडकोट इतिहासकारांना इतिहासाच्या मुळाशी जात मांडण्याचा आग्रह करत आहेत. ग्रंथ, बखरी, पत्रे यांतून त्यांच्या अस्तित्वाच्या लिखित खुणा शोधायची आर्त हाक देत आहेत. दुर्गजिज्ञासाची पायाभरणी झाली ती हीच साद ध्यानी मनी ठेवून. सर्वांत महत्त्वाचे कालपटावर नामसंचिर्तन करावयाची अनाम इच्छा असलेल्या कोणत्याही मनुष्याने वृक्ष-वेलींप्रमाणे नवनव्या उन्मेषाने सदैव फुलत राहायला हवं, अदम्य जिज्ञासेच्या बळावर आपल्या ज्ञानकक्षांचा परीघ वाढता ठेवायला हवा हा मूलभूत सिद्धान्त हा ग्रंथ साकारताना अत्यंत उपयोगी ठरला. वादळात सापडलेली नौका किनाऱ्यावरील दीपगृहाच्या मिणमिणत्या प्रकाशाच्या साहाय्याने किनारा गाठू शकते, अगदी त्याच न्यायाने दुर्गजिज्ञासा ग्रंथाची नौका इतिहासाच्या पानांवर पसरलेल्या असंख्य संदर्भरूपी प्रकाश शलाकांना शोधत पूर्णत्वाच्या काठावर पोहोचली आहे, असे मला वाटते. इतिहासाच्या समृद्ध सागरातील ही ग्रंथनौका संदर्भ-साधनांनी काठोकाठ भरली आहे, हा एक लेखक या नात्याने मी नक्कीच विश्वास देतो. स्थापत्यविशारदांच्या कल्पनेतून उभ्या राहिलेल्या दुर्गांचे वैभव कालपटलावर त्यांच्या भव्यतेची सतत जाणीव करून देत राहील.
प्रदीप संजय पाटील

View full details