Your cart is empty now.
विमान हायजॅक झाल्याच्या घटना क्वचितच घडतात परंतु आपल्यापैकी प्रत्येक जण मात्र रोज इमोशनली हायजॅक होत असतो, तेही अनेक वेळा. विशेष म्हणजे जो इमोशनल हायजॅक होतो त्याला कळतही नाही की तो इमोशनली हायजॅक झालाय. अशा वेळेस आपण जे निर्णय घेतो, प्रतिक्रिया देतो, संवाद साधतो तो आपला नसून भावनेने आपल्यावर नियंत्रण मिळवल्यामुळे, इमोशनली हायजॅकपोटी झालेला असतो.
हे पुस्तक सांगतं... * इमोशनल हायजॅक होणं म्हणजे काय? * आपण हायजॅक का होतो * इमोशन्सवर कसा कंट्रोल मिळवायचा? * भावनेचे प्रकार * भावना हायजॅक असताना किंवा नसताना कसा प्रतिसाद द्यायचा, कशा प्रतिक्रिया द्यायच्या? * भावनांवर नियंत्रण ठेऊन त्याचा योग्य तो उपयोग कसा करून घ्यायचा? * इमोशनल इन्टेलिजन्स कसा वाढवाल?
Added to cart successfully!