EPITAFF by RAMDASI PURUSHOTTAM एपिटाफ
EPITAFF by RAMDASI PURUSHOTTAM एपिटाफ
Couldn't load pickup availability
महासत्तेतील संरक्षण खात्यातील भ्रष्टाचार उघडकीस आणताना सिमॉन व्हिटकोरने प्राण गमावलाय; पण जाता-जाता एक पुरावा ठेवलाय त्याने. त्याचा जिवलग मित्र कसा पोचतो त्या पुराव्यापर्यंत आणि भ्रष्टाचार्यांचं बिंग कसं फोडतो, याचं उत्कंठावर्धक चित्रण आहे ‘एपिटाफ’ या कथेत. ‘अपहरण’ कथेतील सुधीर हा निवृत्त पोलीस अधिकारी. त्याच्या सुंदर, तरुण मुलीचं, ज्योतीचं अपहरण होतं. सुधीर तपासाला निघतो. कोणी केलेलं असतं ज्योतीचं अपहरण? सापडते का ती? भारतातील वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी, मानवतेला काळिमा फासणारा ‘पॉप्स डिसीजन’ हा प्रोजेक्ट राबवताहेत स्मिथ आणि थापर. त्यांना शह देण्यासाठी हाय प्रोफाइल सेक्स वर्कर अवंती, एक मंत्री आणि अन्य आखतात एक योजना. सफल होते का त्यांची योजना? वाचा ‘पडद्यामागे’ या कथेत. ‘अपहृत’ कथेत दोन संघटनांच्या रक्तरंजित संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एका पत्रकाराचं अपहरण झालंय. काय होतं पुढे? वास्तवतेच्या जवळ जाणार्या उत्कंठावर्धक कथा.
पुरुषोत्तम रामदासी यांनी नेस वाडिया महाविद्यालयात जवळजवळ ३४ वर्षं अर्थशास्त्राचं अध्यापन केलं. आकाशवाणी पुणे केंद्रावरील युववाणीसाठी त्यांनी श्रुतिकालेखन केलं आणि प्रसारणातही सहभाग घेतला. आकाशवाणीवरून त्यांची मराठी आणि हिंदी नभोनाट्यं प्रसारित झाली आहेत. अंतर्नाद, हंस, किस्त्रीम, मेनका, माहेर, धनंजय, चंद्रकांत, नवल, मिळून सांजयाजणी, पुरुष उवाच इ. मासिके आणि दिवाळी अंकांमधून त्यांच्या कथा, दीर्घकथा प्रसिद्ध झाल्या आहेत. झरीना का क्या होगा या शॉर्ट फिल्मचे लेखन त्यांनी केले आहे. झेनोफोबिया, मामाचा झाला मामा इ. कथासंग्रह, कातळातील झरे ही कादंबरी इ. साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे. दिवा प्रतिष्ठान तर्फे आयोजित वाचकांची निवड या स्पर्धेत धनंजय दिवाळी अंकातील तांडव कथेस प्रथम पारितोषिक, एकच प्याला चहाचा या नभोनाट्यास अखिल भारतीय नभोनाट्य स्पर्धेत द्वितीय पारितोषिक इ. पारितोषिके त्यांना प्राप्त झाली आहेत.
Share
