Gadkille Ani Mee Hardcover by Dr. Sangram Indore गडकिल्ले आणि मी
Gadkille Ani Mee Hardcover by Dr. Sangram Indore गडकिल्ले आणि मी
Gadkille Ani Mee Hardcover by Dr. Sangram Indore गडकिल्ले आणि मी
पुस्तकातील प्रत्येक किल्ल्याची अचूक, नेमकी आणि स्पष्ट माहिती, किल्ल्याचं आणि तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण जागांचं आपल्या डोक्यात किल्ल्याचं एक चित्रं निर्माण करतं, प्रत्येक फोटो किल्ल्याची सुंदरता दाखवून जातो. किल्ल्यांवरील शिल्प, किल्ल्याचा इतिहास आणि भूगोल या सगळ्यांमुळे ट्रेकिंगला गेल्यावर ’नक्की गडकिल्ल्यांवर काय बघायचंय?' हा विसरत चाललेला संवाद हे पुस्तक प्रकर्षाने साधतं. किल्ल्यावर जाऊन सेल्फी, रील करण्याच्या नादात विसरत चाललेल्या, न बघितल्या जाणाऱ्या किल्ल्यावरील खरी ऊर्जा असणाऱ्या जागा, तिथली वैशिष्ट्यं आणि अवाक करणारा निसर्ग या सगळ्यांची माहिती पुस्तक भरभरून देतं. प्रत्येक पानावरील किल्ल्यांची छायाचित्रे पहिल्या पानापासून तर शेवटच्यापानापर्यंत नजर खिळवून ठेवते. गडकिल्ले आणि इतिहासावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या घरी आणि ऑफिस मध्ये असावे असे उत्तम झालेले पुस्तक. अनेक जेष्ठ इतिहासकार, दुर्गवेडे ट्रेकर्स, छायाचित्रकार यांनी गौरवलेले पुस्तक. तसेच हे पुस्तक पाहून लहान मुलांना नक्कीच गडकिल्ल्यांची आवड निर्माण होईल