Skip to product information
1 of 1

Galib : Kaal, Charitra Aani Vyaktimatva by Dr. Akshaykumar Kale गालिब : काळ, चरित्र आणि व्यक्तिमत्त्व

Galib : Kaal, Charitra Aani Vyaktimatva by Dr. Akshaykumar Kale गालिब : काळ, चरित्र आणि व्यक्तिमत्त्व

Regular price Rs. 700.00
Regular price Sale price Rs. 700.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

मिर्ज़ा असदुल्लाहखाँ गालिब यांचं चरित्र वाचलं का?

'अजब आज़ाद मर्द' अशी स्वतःची ओळख जगाला करून देणाऱ्या मिर्ज़ा असदुल्लाहखाँ गालिबचा जन्म आगरा येथे २७ डिसेंबर १७९७ ला अत्यंत पराक्रमी आणि प्रत्यक्ष रणांगणावर धारातीर्थी पडलेल्या अब्दुल्लाबेगखाँ या तुर्क सरदाराच्या पोटी झाला.

'सौ पुश्त से है पेश-ए-आबा सिपहगरी।

कुछ शायरी ज़रीअ-ए-इज़्ज़त नहीं मुझे', असा आपल्या लष्करी घराण्याविषयी अभिमान बाळगणाऱ्या गालिबने पूर्वजांचा बाण माझ्या हातात लेखणी बनून आला आहे हे आग्रहपूर्वक जगाला सांगितले व त्याच निर्धाराने आपले जीवन अंगावर कोसळलेल्या आपदाविपदांशी संघर्ष करीत घालविले.

१८५७च्या स्वातंत्र्यसमराचा आणि त्या दरम्यान झालेल्या प्रचंड नरसंहाराचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असणाऱ्या गालिबने फार्सीत व उर्दूत लक्षणीय काव्यरचना केली आणि पत्रलेखन या वाङ्मयप्रकाराला आपल्या व्यक्तिमत्त्वाचे आगळेच परिमाण दिले. आपल्यात जेवढ्या खुब्या ईश्वराने भरल्या आहेत, तेवढ्या हजारात एखाद्या माणसात भरल्या असतील, हे त्याचे स्वतःबद्दलचे प्रांजळ आकलन किती खरे होते, ह्याची जाणीव त्याच्या चरित्राचा वेध घेताना पदोपदी होते.

सम्राटापासून फकिरापर्यंत, न्यायाधीशापासून कैद्यांपर्यंत, कळ्यांपासून फुलांपर्यंत सगळ्यांसाठीच आपल्या प्रेमाचे क्षितिज विस्तारणाऱ्या आणि धर्म व संप्रदाय ह्यांच्या दास्यत्वापासून सदैव मुक्त असणाऱ्या गालिबने आपल्या आशानिराशेने संपृक्त झालेल्या अनोख्या जीवनानुभूतीच्या साक्षात्काराचे अनवट सौंदर्यरूप मागे ठेवून १५ फेब्रुवारी १८६९ ला दिल्ली येथे या जगाचा निरोप घेतला.

 

#चरित्र

View full details