Skip to product information
1 of 1

Jugar | जुगार by AUTHOR :- Baba Bhand

Jugar | जुगार by AUTHOR :- Baba Bhand

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

आपल्याकडे महाभारतकाळापासून राजकारणी माफियांनी धन आणि सत्ता संपादनासाठी जुगाराच्या माध्यमाचा वापर केलेला आढळतो.
आजही जगभर कॅसिनो आणि रेडलाइट एरियातून चालणारा जुगार, वेश्याव्यवसाय, तस्करी आणि टोळीयुद्धे हे भांडवली संस्कृतीचे उपांग झालेले आहे.
बाबा भांड यांनी मात्र हा अधोलोकाचा विषय ‘जुगार’ या कादंबरीतून अपरंपारिक पद्धतीने हाताळला आहे.
कादंबरीचा नायक आबा मानवी पड्विकरांच्या स्वाभाविक प्रवृत्तीतून जुगारात आणि पाठोपाठ वेश्यागमनाकडे ओढला गेला आहे.
या दोन्ही ठिकाणचा त्याचा वर्तनव्यवहार मात्र लोकविलक्षण आहे.
स्वत:चे सर्व आयुष्य तो जुगारात उधळून देतो; पण बहकून जात नाही.
मटक्याचे आकडेशास्त्र, जुगाराचे मानसशास्त्र्ं आणि प्रतिस्पर्धांची खेळी ओळखण्याचे कौशल्य यावर त्याची भक्कम पकड आहे.
जुगारात स्वत:ला उधळून देण्यासाठी लागणारी बेफिकिरीही त्याच्याजवळ आहे.
जिंकण्या हरण्याच्या पलीकडे जाऊन जुगाराकडे पाहण्याची निर्भरशील क्रीडावृत्ती हा त्याचा स्थायिभाव असल्याने उन्माद आणि वैफल्य या दोन्ही टोकांपासून स्वत:चा बचाव करण्यात तो यशस्वी होतो.
वेश्येच्या सहवासात स्वच्छंद प्रेमाचा आणि नितळ सौंदर्याचा मनमुराद अनुभव घेतानाही विमुक्तताच त्याची नैतिक पाठराखण करते. कामुक व्यभिचारापलीकडची ही निखळ मानुषता स्वत:च्या धर्मपत्नीशी वागतानाही कायम राहते. परुषसत्ताक दडपशाहीचा समाजमान्य कैफ किंवा नैसर्गिक भिन्न लिंगी आकर्षगातून उसळी मारून येणारी स्त्रैणता या दोन्हींपासून दूर राहून आपल्या न-नैतिक दृष्टीतून तो या दोन्ही स्त्रियांना सन्मानाने वागवतो. या मानवी अस्मिताभावाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठीच कोठीवरून आणलेल्या रीनाची गाजत मिरवणूक काढून गृहप्रतिष्ठापना करू पाहतो. इतके विधायक गुण असूनही आबा जुगारी का होतो हे मात्र एक कोडेच आहे. माणसातल्या अशा जुगारी वृत्तीच्या सनातन प्रेरणांचा शोध घेणारी आणि ऐहिक व पारमार्थिक पातळीवरच्या जुगाराच्या अध्यात्मशास्त्राची नाळ उलगडणारी मराठीतील कदाचित ही पहिलीच कादंबरी असावी.

View full details