Your cart is empty now.
कार्ल मार्क्सच्या प्रभावाची तुलना फक्त येशू ख्रिस्त किंवामहंमद पैगंबर यांच्याशीच होऊ शकेल. अब्जावधी लोकांच्यामानसिकतेवर, कल्पनाविश्वावर आणि आशा-आकांक्षांवरया एका माणसाच्या विचारांनी चक्क राज्य केलं! त्याच्याविचारांची झिंग आणि प्रेरणा घेऊन लढणारे आणि प्राण देणारेकोट्यवधी जसे उभे राहिले, तसेच तितकेच लोक त्याचासंपूर्ण तिरस्कार आणि धिक्कार करत त्याच्या विचारांचानायनाट करण्यासाठी त्याविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले...आणि हे चक्क गेली दीडशे वर्षं चाललं! अजूनही संपूर्णकम्युनिझमचा पाडाव केल्याचा दावा जरी पाश्चिमात्य राष्ट्रकरीत असली, तरी जगाला मार्क्सवादाचा विचार कुठे ना कुठेकरावाच लागतो. त्याच्या बाजूने तरी किंवा त्याच्याविरुद्धतरी! कोणीतरी म्हटल्याचं आठवतंय, 'एक तर तुम्ही त्याच्याबाजूने तरी असाल किंवा त्याच्या विरुद्ध; पण त्याच्याकडेदुर्लक्ष करणं हे अशक्य आहे!'
Added to cart successfully!