Skip to product information
1 of 1

Magal Te Milel | मागाल ते मिळेल by AUTHOR :- Esther & Jerry Hicks

Magal Te Milel | मागाल ते मिळेल by AUTHOR :- Esther & Jerry Hicks

Regular price Rs. 315.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 315.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

इच्छापूर्तीचे व अधिक आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्या इच्छा प्रकट करायला शिकविणारे विलक्षण असे हे पुस्तक आहे.
तुमचे नातेसंबंध, आरोग्य, आर्थिक व्यवहार, करिअर इत्यादी गोष्टींवर वैश्विक नियमांचा प्रभाव असतो व त्यांचे तुमच्या स्थळ-काळाशी निगडित असलेल्या वस्तुस्थितीवर नियंत्रण असते.
त्यामुळे आयुष्यात कल्याणाचा प्रवाह प्रवाहित करण्यासाठी उपयुक्त असे अतिशय परिणामकारक उपाय या पुस्तकात आहेत. समृद्ध, परिपूर्ण व समाधानी आयुष्य जगणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि अशा रीतीने जगण्याचा प्रत्येक मार्ग हे पुस्तक तुम्हाला दाखवते.
अब्राहम-हिक्सच्या शिकवणीनुसार प्रत्येकाने स्वत:च्या कल्याणासाठी इच्छा कशा प्रकट कराव्यात, याविषयाशी संबंधित आतापर्यंत सहाशेपेक्षा जास्त पुस्तके, ऑडिओ, व्हिडिओ आणि सीडीज् ईस्थर आणि जेरी हिक्स यांनी प्रसिद्ध केल्या आहेत. www.abraham-hicks.com ही त्यांची वेबसाइट आहे.

“इतकं साधं, सरळ ; परंतु अतिशय प्रभावी असं पुस्तक मी पहिल्यांदाच वाचलं. या पुस्तकामुळं एखाद्याचं संपूर्ण आयुष्यच बदलू शकतं आणि हे किती प्रेमपूर्वक सांगितलंय! हे पुस्तक म्हणजे आयुष्यभराचा खजिनाच आहे!”
– नील डोनाल्ड वॉल्श
‘कॉन्व्हर्सेशन्स विथ गॉड’ या पुस्तकाचे लेखक
“हे अतिशय उत्तम पुस्तक आहे. मी आणि माझ्या पत्नीने अनेक वर्षांपासून अब्राहमच्या सखोल व अतिशय व्यावहारिक वचनांचा आस्वाद घेतला आहे. तुमच्यासाठीदेखील ते उपयुक्त ठरेल असा आमचा विश्वास आहे. माझ्या सर्व मित्रांनी हे पुस्तक वाचायलाच हवं.”
– जॉन ग्रे.
‘मेन आर फ्रॉम मार्स,
वुमन आर फ्रॉम व्हिनस’
या पुस्तकाचे लेखक

View full details