महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या व्यापक कार्याचे विवेचन करणारे अभ्यासपूर्ण लेख या पुस्तकात आहेत. प्रस्तुत पुस्तक म्हणजे केवळ महर्षी शिंदे यांचे चरित्र नाही, तर त्यांच्या संपूर्ण सामाजिक चळवळीचा इतिहासच आहे. ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ हा डॉ. दहातोंडे यांचा केवळ संशोधनाचा विषयच नाही, तर म. शिंदे यांच्या विचारांचा ते आयुष्यभर जागर करत आले. म. शिंदे यांच्या कार्याचा प्रचार हेच त्यांचे आयुष्य झाले आहे, त्यांच्या लेखनामागील ही तळमळ म. शिंदे यांच्या कार्याचे मर्म सांगणारी आहे. आजच्या सामाजिक परिस्थितीत म. शिंदे यांचे चरित्र व कार्य सर्वांनाच दीपस्तंभाप्रमाणे आहे. समाजपरिवर्तनाची आस असणार्यांना हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल