Skip to product information
1 of 1

Martand By Nisha Sanjay Thore मार्तंड

Martand By Nisha Sanjay Thore मार्तंड

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

'मार्तंड' म्हणजे इतिहासाच्या पाऊलखुणा अन कल्पनेचे विंवेकी लेणे! खरं तर इतिहास हा केवळ सत्तासंघर्षाचाच दस्तावेज नसतो, तर तो मानवी भावनांचा आणि पडद्यामागच्या त्यागाचा मूक साक्षीदारही असतो. लेखिका निशा संजय थोरे यांची मार्तंड ही कादंबरी, याच ऐतिहासिक सत्याला कल्पनेच्या अलवार साजाने नटवणारी एक समृद्ध कलाकृती आहे. या पुस्तकाचे बलस्थान म्हणजे याची प्रवाही भाषा, प्रसंगनिर्मितीची सूक्ष्मता आणि कुठेही पाल्हाळ न लावता मांडलेली अर्थपूर्ण संवादांची गुंफण.
मराठी ऐतिहासिक साहित्यात सत्याचा अपलाप व करता केलेली ही मांडणी एका प्रगल्भ दृष्टिकोनाचे दर्शन घडवते. मानवी मनातील द्वंद्व, निष्ठेची पराकाष्ठा आणि ऐतिहासिक फिक्शनमधील जबाबदार लेखन या त्रिवेणी संगमामुळे ही कादंबरी केवळ माहिती न राहता एक उत्कृष्ट साहित्यिक अनुभव ठरते. नवनवीन प्रयोगांची ओढ असलेल्या दर्दी वाचकांसाठी हे पुस्तक एक अनमोल ठेवा ठरेल. __देवा गोपीनाथ झिंजाड (एक भाकर तीन चुली) 

View full details