Mazee Sainyagatha(माझी सैन्यगाथा)
Mazee Sainyagatha(माझी सैन्यगाथा)
Couldn't load pickup availability
नागरी जीवनापेक्षा सैनिकांचे जीवन खूप वेगळे! त्यांचे प्रश्न, त्यांची आव्हाने जशी वेगळी आहेत- तसेच जीवनाकडे आणि संसाराकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोनही किती, कसा आणि का वेगळा आहे हे प्रिया जोशी यांचे `माझी सैन्यगाथा` हे पुस्तक वाचत असताना सहजपणे उलगडत जाते.
रात्रंदिन युद्धाचा प्रसंग जसा सीमेवरील सैनिकांसमोर असतो तसाच दूरवर त्यांचे घर सांभाळणाऱ्या पत्नीवरही कसा असतो ते लेखिकेच्या खुमासदार शैलीत वाचायला मिळते. भारतीय सैन्यात अधिकारी असलेले प्रियाचे पती सीमेवर तैनात असताना आपल्या दोन लहान मुलींसोबत पतीपासून दूर रहात असताना प्रियाला आलेले अनुभव वाचनीय आहेत.
लेखिकेने पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे- तिच्या काकांनी फार छान शब्दात याचे वर्णन केले आहे-
‘युद्धावर गेले पती, राखे घर वीरपत्नी,
आघाड्यांवर वेगळ्या दोघेजण लढताती..’
Share
