या अयशस्वी किंवा हरलेल्या मणसांच्या गोष्टी नाहीत. या आहेत चित्रपटसृष्टीच्या चकाकत्या जगात सामोर्या येणार्या कोरड्या, हिशेबी वास्तवाच्या गोष्टी. यात असेही आहेत ज्यांच्या हाती कधी काही लागलच नाही. असेही आहेत ज्यांच्या हाती लागलेल राखल नाही
वाटत सर्वांनाच असत की आपण शाहरुखसारखे हात पसरावेत. वाटत सर्वांनाच असत की आपण सनीसारखा हॅंट पंप उखडावा. वाटत सर्वांनाच असत आपण लाखो करोडोंच्या हृदयावर अधिराज्य कराव. या वाटण्याच्या आणि प्रत्यक्ष घडण्याच्या तफावतीतूनच जन्माला येतात न- नायक.
