Nastikache Punya By Martand Valake नास्तिकाचे पुण्य
Nastikache Punya By Martand Valake नास्तिकाचे पुण्य
Couldn't load pickup availability
महाराष्ट्राची लोकसंस्कृती समाज प्रबोधन करण्यासाठी अनेक अंगाने समृध्द् आहे. यातील लोककला अनेक धर्मविधीतून उदयाला आलेल्या आहेत. जनमानसावर लोकसंस्कार घडविण्यासाठी याच विधीतून लोककथांचा उदय झाला. मी यातील लोककथांचा सामाजिक मूल्यात तोलून अभ्यास केला. यामधील दुर्मीळ लोककथांना पुन्हा नव्या जोमात प्रकट करण्यासाठी 'नास्तिकाचे पुण्य' या आध्यात्मिक कथानकाला आपल्या लेखणीतून साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. याला कितपत यश आलेले आहे, वाचकच ठरवतील. ते संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून श्रीविठ्ठल व श्रीखंडेरायांच्या पंढरी आणि जेजुरीच्या गुणवैशिष्ट्याचे तुलनात्मकरीतीचे वर्णन आपल्या अभंगातून व्यक्त केले होते. त्याचे कवण अजूनही कीर्तन व जागरणातून मोठ्या आवडीने गायले जात आहे. महाराजांनी त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीत समाज मनावर असणारा शैव आणि वैष्णव संप्रदायातील भेद मोठ्या कुशलतेने आपल्या अभंगातून घालविण्याचा प्रयत्न केला. त्याचे भक्त लोकांनी मोठ्या आवडीने स्वागत केले. श्रीविठ्ठल हे मनाचे देव आहेत. तसे श्रीखंडेराया हे संसारिक दैवत आहे. यातील दोन्ही आध्यात्मिक संस्काराची मानवाला गरज होती. म्हणून या दैवतांच्या आणि त्यांच्या भक्तांच्या कथा, समाज प्रबोधनासाठी संत महंतांनी आपल्या लोकवाणीतून भाविकांसमोर सादर केल्या होत्या. पुढे काळाच्या बदलत्या सुविधेमुळे लोकशिकवणीसाठी करमणुकीची माध्यमे बदलली. त्यामुळे लोकशिकवण देणाऱ्या कथा अजूनही अज्ञात आहे. त्याची आज देखील माणसाला गरज आहे. त्यालाच मी शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
Share
