Niperya by Vishnu Tanaji Wagh निपेऱ्या
Niperya by Vishnu Tanaji Wagh निपेऱ्या
Couldn't load pickup availability
गाडून घेतल्याची गोष्ट .. निपेऱ्या
सावली पेरणारे, उद्याचा श्वास निर्माण करणारे प्रत्येक हात हे माझे सहकारी आहेत. सह्याद्री देवराईत काम करणारे व गावोगावी स्वतंत्र वृक्षलागवड संस्था तयार करणारे, निसर्गाचे रक्षण करणारे आणि धरतीवर नैसर्गिक ऑक्सिजन निर्माण करणारे हे देखील माझेच सहकारी आहेत. नाशिकच्या तपोवनात भेटलेला वृक्षमित्र विष्णू वाघ हा संवेदनशील व प्रकृतीप्रेमी व्यक्ती आता साहित्य क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्याने अनेक कविता झाडांसाठी लिहिलेल्या आहेत; आता तो "निपेऱ्या" नावाचे पुस्तक घेऊन येत आहे.
हे पुस्तक वाचत असताना मनाला अस्वस्थ करते, तसेच ते अंतर्मुख करणारेही आहे. अतिशय हृदयद्रावक आणि काळजाला पाझर फोडणारे हे पुस्तक वाचताना अंगावर अक्षरशः काटा येतो. निपेऱ्याच्या संघर्षाची कहाणी ही एक जिवंत कहाणी आहे, असेच वाटते. मानवता पेरणारे हे पुस्तक आहे. विष्णूच्या लेखनातील प्रत्येक शब्द हा अंतःकरणातून आलेला आहे. पारदर्शी मनाने मानवतेचा झेंडा तो नेहमी फडकवत असतो; त्याचे हे पुस्तक एक वेगळी ओळख निर्माण करेल.
पुस्तकात अलंकारिक भाषा कमी असली, तरी बोलीभाषेतील शब्दांचा साज त्यावर चढवलेला आहे. झाडांच्या आणि शब्दांच्या नंदनवनात त्याची बांधिलकी अक्षर राहो, सदाहरित राहो ! मातीवर व मातीतील झाडावर जीव जडलेल्या वृक्षमित्र विष्णूला "निपेऱ्या" या पुस्तकासाठी व पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा...! - सयाजी शिंदे (सुप्रसिद्ध अभिनेते)
लेखक : वृक्षमित्र विष्णू वाघ
प्रकाशन : पेन पब्लिशिंग हाऊस
Share
