Your cart is empty now.
Nivadak Ruturang निवडक ॠतुरंग by Arun Shevate अरुण शेवते
निवडक ऋतुरंग’ या ग्रंथात ‘व्यक्तिविशेष’ या २० वर्षातील निवडक लेखांचा समावेश केलेला आहे. ऋतुरंगाने अनेक विषयाबरोबर ‘व्यक्तिविशेष’ विशेषांक काढले. आणि त्याचबरोबर इतरही अंकात त्या त्या विषयाच्या गरजेनुसार ‘व्यक्तिविशेष’ लेखांचा अंतर्भाव दिवाळी अंकात केला आहे. ‘सात आंधळ्यांची आणि हत्तीची गोष्ट’ याची आवर्जुन आठवण होते. माणूस म्हटला की त्याच्या जाण्याला अनेक पहर असतात. एका साच्यात माणसाला बसवता येत नाही. वेळोवेळी येणारे दुःखाचे झगडण्याचे प्रसंग आयुष्यात महत्त्वाचे असतात. पण त्याच बरोबर संघर्षा व्यतिरिक्तही माणसाचे आयुष्य घडत असते. अनेक नातेसंबंधातूनही जगणे घडत जाते. आपण विचार करू तेवढा थोडाच आहे. ‘भावनाशील’ या एका मनोवृत्तीचा विचार केला तरी त्याचे अनेक पहर आपल्या लक्षात येतात. मनरची भावनाशीलता, व्यवहारिक भावनाशीलता, नातेसंबंधाची भावनाशीलता गरजेतून निर्माण होणारी भावनाशीलता, एकटेपणातून निर्माण होणारी भावनाशीलता, भाबडेपणातून निर्माण होणारी संवेदनशीलता परस्पर संबंधातील घटनेशी निगडीत असलेली भावनाशीलता. अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. माणसाचा मेंदू समजून घेणे अशक्यप्राय गोष्ट आहे
Added to cart successfully!