Your cart is empty now.
हे पुस्तक म्हणजे पीयूषचं अव्वल दर्जाचं काम आहे. प्रचंड ऊर्मीनं, थेटपणे आणि
जसे आहेत तसे आपले अनुभव आणि प्रभावित करणार्या असंख्य गोष्टी
त्यानं सांगितलेल्या आहेत. अशा गोष्टी, ज्यांच्यामुळे भारतीय जाहिरातविश्वात गेली
दोन दशकं सामनावीर राहिलेल्या या मनुष्याचं करिअर आणि आयुष्य घडत गेलं.’
भारत पुरी, व्यवस्थापकीय संचालक, पिडिलाईट इंडस्ट्रीज
‘पांडेपुराण हे समकालीन भारतीय जाहिरातविश्वावरचं बहुधा आजवरचं सर्वश्रेष्ठ पुस्तक आहे. ज्याला हा देश आवडतो, इथले भरभराट होत असलेले ब्रँड्स आवडतात आणि मार्मिक असं जाहिरातविश्व आवडतं, त्या प्रत्येकानं वाचलंच पाहिजे असं हे पुस्तक आहे. भारतीय मातीतल्या सुपुत्राचं हे खर्या अर्थानं ‘मेक-इन-इंडिया’ पुस्तक आहे.’
सुहेल सेठ, लेखक आणि मार्केटिंग गुरू.
‘पीयूष जे काही करतो ते आकर्षकच असतं. तळागाळातल्यांविषयी असलेली संवेदनशीलता आणि जवळजवळ प्रत्येकाशी संवाद साधण्याची हातोटी,
या त्याच्याकडे असलेल्या दोन गोष्टी अक्षरश: कुठल्याही क्षेत्रात काम
करणार्या व्यावसायिकांनी शिकण्यासारख्या आहेत.’
आनंद महिंद्रा, अध्यक्ष, महिंद्रा समूह
‘पीयूष म्हणजे कल्पना, विनोद आणि सर्जनशील चैतन्याचा खळाळता प्रवाह आहे
आणि ‘पांडेपुराण’मध्ये या सगळ्यांचं प्रतिबिंब पडलेलं आहे. जाहिरातक्षेत्रातल्या लोकांसाठी ‘देसी जाहिराती’ म्हणजे काय आणि त्या किती परिणामकारक असू शकतात हे समजून घेण्यासाठी हे एक वाचलंच पाहिजे असं पुस्तक आहे.’
किशोर बियाणी, सी.ई.ओ., फ्यूचर समूह
‘सोपं आणि आकर्षक
Added to cart successfully!